उस्मानाबाद येथील बौध्द श्मशान भुमीतील विकास कामांना गती मिळाली असुन निवारा शेडवरती स्लॅब टाकण्यास सुरुवात झाली, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांच्या हस्ते स्लॅब मशिनला पुष्पहार अर्पण व नारळ फोडुन उद्घाटन करण्यात आले.
गरसेवक सिध्दार्थ बनसोडे यांच्या प्रयत्नातून विकास कामांना गती मिळत आहे.बौध्द श्मशान भुमीतील पाणी,विजेच्या प्रश्नासह दहन शेड,निवारा शेड अन्य विकास कामेही चालू आहेत.कर्तव्यदक्ष नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे व लोकप्रिय नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी वेळोवेळी केलेल्या प्रयत्ना मुळेच हे शक्य झाले असुन समाज बांधवांनी देखिल याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. उद्घाटन प्रसंगी नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे,अभियंता अनिल गरड,सामाजिक कार्यकर्ते अंगुल बनसोडे,बाबासाहेब बनसोडे,देवानंद एडके,सोमनाथ गायकवाड,संजय गजधने,सचीन वाघमारे,विनायक गायकवाड,शहाजी बनसोडे,धम्मपाल शिंगाडे अन्य उपस्थित होते.
