२०२०-२१ हंगामातील तूर खरेदीसाठी केंद्र शासनाने सहा हजार रुपये प्रती क्विंटल दर निश्चित केला आहे. या खरेदीसाठी नाफेडतर्फे जिल्ह्यात तूर खरेदी केंद्र सुरू केले असून या केंद्रांवर दि. २८ डिसेंबरपासून ऑनलाइन नावनोंदणी सुरू झाली. शेतकऱ्यांनी आपले नाव ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी सातबारा, आठ अ उतारा, आधारकार्ड झेरॉक्स, राष्ट्रीयीकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, मोबाइल क्रमांक या कागदपत्रांसह अधिकृत खरेदी केंद्रावर नाव नोंदणी करावी. लागेल.उस्मानाबाद तालुक्यासाठी उस्मानाबाद शहरातील तालुका शेतकरी सह. संघ लि., आणि येडशी येथील तुगांव विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि., तुगांव. भूम तालुक्यासाठी भूम शहरातील श्री. शिवाजी भूम तालुका शेतकरी सह. ख. वि. संघ. वाशी तालुक्यासाठी वाशी येथील तालुका शेतकरी सह. संस्था. लि. तुळजापूर तालुक्यासाठी नळदुर्ग येथील तालुका शेतकरी सह. ख. वि. सं लि. लोहारा तालुक्यासाठी नागूर येथील यशवंतराव चव्हाण कृषी उत्पादन विकास सहकारी संस्था म. लोहारा व कानेगाव येथील जगदंबा खरेदी विक्री सहकारी संस्था, उमरगा तालुक्यासाठी गुंजोटी येथील श्री. स्वामी समर्थ सेवा सह. संस्था, कळंब तालुक्यासाठी कळंब येथील एकता खरेदी विक्री सहकारी संस्था व शिराढोण येथील तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संघ, तसेच पारगाव येथील कै. महारुद्रा मोटे कृ. उ. वि. प्र. स. संस्था, ईट येथील तनुजा महिला शेतीपूरक से. पु. स. संस्था सोनेवाडी या खरेदी केंद्रावर नाव नोंदणी करावी, असे आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळावा यासाठी राज्याच्या प्रत्येक जिल्हयात सरकारने हमी भाव केंद्र सुरू केले आहे. काही महिन्यांपासून तूर शेतकऱ्यांना चांगले दिवस आहेत. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात तुरीला ८५०० भाव आला होता. कारण मागील वर्षी हंगामाची सुरूवात जोरात झाली होती. भावाची तेजी यंदाही कायम राहील अशी आशा शेतकऱ्यातून व्यक्त होत आहे.
