तुळजापूर /प्रतिनिधी-
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते. ओएनजीसी संचालक सांबित पात्रा यांनी १ जानेवारी रोजी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन देशातून कोरोनाचे संकट दूर होवो अशी प्रार्थना केली.
दर्शनानंतर नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी पात्रा यांचा सत्कार केला.यावेळी सोलापूरचे आ. विजयकुमार देशमुख, नगरसेवक अभिजित कदम, गुरुनाथ बडुरे, शिवानंद पाटील आदि उपस्थित होते.यावेळी रोचकरी यांनी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी विविध राज्यातून भाविक दररोज हजारोच्या संख्येने तुळजापुरात येतात भाविंकाच्या सोयीसाठी या तीर्थक्षेत्राचा केंद्रीय पर्यटन क्षेत्राच्या यादीत समावेश व्हावा यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करण्याची मागणी निवेदनाद्वारे पात्रा यांच्याकडे रोचकरी यांनी केली.
