तालुक्यातील तामलवाडी ग्रामपंचायत सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजली जाते या ग्रामपंचायतवर कब्जा मिळवण्यासाठी जोरदार चुरस निर्माण झाली आहे.
तुळजापूर तालुक्यातील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राचा सरहद्द व तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी हे शेवटच गाव असुन तेथुन पुढे पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा आरंभ होता .हे गाव महामार्गावर असल्याने व येथुन सोलापूर वरेल्वे स्टेशन जवळ असल्याने येथे मिनी औद्योगिक वसाहत असुन येथे अनेक नामवंत कंपनीचे कारखाने आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतला कर रुपाने मोठा अर्थिक प्राप्ती होत असल्याने या ग्रामपंचायतवर कब्जा मिळवण्यासाठी सध्या चुरस निर्माण झाली आहे.
तामलवाडी ग्रामपंचायत साठी अकरा जागा असुन ऐक जागा बिनविरोध निघाली आहे येथे पावणे चार हजारचा आसपास मतदार आहेत. सध्या येथे सोशल मिडीया माध्यमातून आँडीओ व्हीडीओ माध्यमातून प्रचाराची धुम सुरु आहे आरोप प्रत्यारोपाचा फैरी झडत आहेत प्रचारात तरुणाई मोठ्या प्रमाणात सक्रिय दिसत आहे उमेदवार घरोघरी जावुन मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधुन प्रचार करीत आहात मोठे नेते प्रचारापासुन दूर दिसत आहेत. यात माञ विकासाचे मुद्दे दूर राहिल्याचे दिसुन येत आहे.
येथील विजयात नातेवाईक फँक्टर महत्त्वाचा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मतदार माञ स्पष्ट पणे बोलावायास तयार नसल्याने कोण विजयी होणार याचा अंदाज बांधणे कठीण ठरत आहे.ऐकंदरीत ही निवडणुक ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे कारण राज्या बरोबरच तालुक्याचा राजकारणाचे सुञ बदलले आहे यागावचा पंचक्रोषीत असणाऱ्या दहा ते पंधरा गावचा संबध तामलवाडीशी येत असल्याने पक्षांना नेत्यांना यावर आपल्या समर्थकांचे वर्चस्व असावे असे वाटत असल्याने अदृश्य स्वरुपात मदत पँनलला पोहचवली जात असल्याची चर्चा आहे ्र. यात ऐका पँनल भाजपाचे तर दुसऱ्या पँनलला कांँग्रेस नेत्यांचे अदृश्य पाठबळ असल्याचे समजते
बिनविरोध मध्ये नातेवाईक फँक्टर!
तामलवाडी येथे दोन्ही पँनल मधुन नातेवाईक परस्पर विरोधी उभारल्याने यातील एका नातेवाईकाने अर्ज माघार घेतल्याने दुसरा नातेवाईक विजयी झाल्याने बिनविरोध मध्ये ही नातेवाईक फँक्टर महत्त्वाचा ठरला.
