तेर / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे कै.डाॅ.चंद्रकलादेवी पद्मसिंहजी पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त घेण्यात आलेल्या  बालकवि सम्मेलन स्पर्धैतील विजेते व सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्यांना आ.राणाजगजितसिह पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

२०२० मध्ये बाल कवि सम्मेलनातील प्रथम विजेते समिक्षा आंधळे, व्दितीय विजेती सानिया मुलांनी, तृतीय विजेती वैष्णवी कदम तर जानेवारी २०२१ मध्ये  १२ वी च्या विद्यार्थी,  विद्यार्थीनीसाठी घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेतील प्रथम विजेती अंजली शिंदे,द्वितीय विजेती अनुसया झिंजे, तृतीय विजेती ज्ञानेश्वरी लोमटे यांना आ. राणाजगजितसिह पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.स्पर्धैचे आयोजन नरहरी बडवे यांनी केले होते.यावेळी दत्तात्रय मुळे, सरपंच नवनाथ नाईकवाडी, नवनाथ पांचाळ,मज्जित मनियार, नवनाथ इंगळे, भारत नाईकवाडी आदी उपस्थित होते.


 
Top