तुळजापूर / प्रतिनिधी- 

 शिकलेल्या महिला घरात बसल्याने त्यांच्या बुध्दीला गंज चढला होता माञ बुध्दीचा गंज काढण्याचे काम उमेद अभियानने  केला, असे प्रतिपादन खंडाळा येथील झाशीची राणी ग्रामसंघाच्या सचिव,राहीबाई पवार यांनी मक्ररसंक्रात निमित्ताने महिला बचत गटाचा वतीने आयोजित हळदी-कुंकु कार्यक्रमात केले.

यात खंडाळा गावातील महिलांनी मनमोकळी पणे चर्चा करुन हळदी-कुंकु कार्यक्रमाचे सार्थक चांगला कामासाठी केले. यात उमेद अभियानचाकल्पना भुरे (सी सी ), जनाबाई लोंखडे (सी. एच ), सुर्वणा कांबळे (सीआरपी ), अर्चना पवार, अभया अादिनी मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना   राहीबाई पवार म्हणाल्या की, या ग्रामसंघाला ५ वर्ष  पुर्ण झाले आसुन या ५ वर्षात येथील महिलांना स्वावलंबनासह खुप काही शिकवले त्यामुळे आमची प्रगतीचे दारे उघडली गेली आम्हाला आदर्श ग्रामसंघ पुरस्कार मिळाला असुन यात खंडाळा ग्रामपंचायतचा सिंहाचा वाटा असल्याचे यावेळी सांगितले .यावेळी पशुसखी कृषीसखी ग्रामसंघ पदाधिकारी व २७  महिला बचत गटाच्या पदाधिकारी उपस्थितीत होत्या

 
Top