उमरगा / प्रतिनिधी- 

गुलबर्गा-लातुर महामार्गावरील मातोळा पाटी जवळ बोलोरो जीप व पिकॲप टेंम्पो याची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात  नऊ जण जखमी झाले आहेत. हि घटना गुरूवारी (दि २१) दुपारी सव्वा चार वाजता घडली.

याबाबतची माहिती अशी की, तालुक्यातील कलदेव निंबाळा येथील चार जण बोलेरो जीप (क्रमांक एम एच २५ एएस १०९१) मधून लातूर येथे रुग्णालयात गेले होते. लातूरहून गावाकडे परत येताना गुलबर्गा- लातूर मार्गावरील मातोळा गावाजवळ उमरग्याहून लातूरकडे जाणाऱ्या ऊसतोड कामगार कर्नाटकातून गावाकडे पिकॲप टेंम्पोने (क्रमांक एम एच ४४ यु ०३१८) जाताना अचानक टायर फुटल्याने बोलेरो जीपवर जावून जोरदार धडक बसून टेंम्पो रस्त्यावर पलटी झाला. जीप व टेंम्पोच्या झालेल्या अपघातात जीपचे चालक श्रीकृष्ण काशिनाथ बिराजदार (३७) रा काळनिंबाळा, रशिकाबाई चंद्रकांत पाटील (५३), शिल्पाराणी चंद्रकांत पाटील (२८), शीतल चंद्रकांत पाटील (२२) सर्व रा. कलदेव निंबाळा, टेंम्पो चालक ज्ञानेश्वर आत्माराम गायकवाड (३४) रा पिंपळगाव, श्रीकृष्ण विश्वनाथ कदम (४०), सौ उर्मिला श्रीकृष्ण कदम (३४),प्रगती श्रीकृष्ण कदम (०८) रा तिघे जण कदमवाडी, रवी बापु कोराडे (२४) रा कोरडेवाडी हे नऊ जण जखमी झाले असून सौ रशिका चंद्रकांत पाटील, शिल्पाराणी पाटील व शीतल पाटील गंभीर जखमी असल्याने तिघांना सोलापूरच्या रुग्णालयात रेफर करण्यात आले असून उर्वरित सहा जणांवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 
Top