तुळजापूर / प्रतिनिधी- 

 तालुक्यात राष्ट्रीय ग्राहक दिन पंधरवडा मध्ये सामाजिक व आर्थिक दृष्ट्या कमकुवत अशा एकल, विधवा महिला, घर कामगार मजूर  महिला,शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब यांचे  अर्ज प्राप्त करून त्यांना अन्न सुरक्षा योजनेतील प्राधान्य कुटुंब योजनेत समाविष्ट करण्यात आले असुन योजनेचे लाभ घेण्याचे आवाहन तहसिलदार सौदागर तांदळे, पुरवठा निरिक्षकण अधिकारी संदिप जाधव यांनी केले आहे.  

  महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात तहसीलदार  यांचे हस्ते तहसील कार्यालय तुळजापूर येथे अन्न सुरक्षा योजनेचे रेशन कार्ड देण्यात आले आहे.  महिलांना शिधापत्रिकाचे धान्य लाभ मिळवून देण्यासाठी  तहसीलदार  सौदागर तांदळे यांचे मार्गदर्शन तसेच संपत झळके , राज्य अन्न आयोग सदस्य यांचे सहकार्य मिळाले.प्रसंगी पुरवठा विभागाचे कर्मचारी हे उपस्थित होते. तालुक्यात मागील 8 महिन्याच्या कालावधीत अन्न धान्यापासून वंचित असलेल्या कुटुंबाना प्राधान्य  व शेतकरी लाभार्थी या योजनेचा लाभ  देण्यात आला आहे. ज्यात ६१८ शिधापत्रिका व त्यावरील २९२४ सदस्यांना प्राधान्य योजनेचा लाभ देण्यात आला आहे तसेच २७४ कुटुंबातील १३४९ सदस्यांना शेतकरी लाभार्थी योजनेचा लाभ देण्यात आला आहे. 

वरील दोन्ही योजनेत  प्रति व्यक्ती ३ किलो गहू २ रुपये  या दराने व प्रति व्यक्ती २ किलो तांदूळ ३ रुपये  या दराने धान्य लाभ दिले जात आहे


 
Top