शिराढोण / राजेंद्र मुंदडा 

शेतकऱ्यांच्या अतिशय हिताची योजना म्हणजे पोखरा योजना. सदरील योजनेत जे गाव आले तेथे पाच वर्षापर्यंत ही योजना आमलात आसते. यामध्ये फळबाग लागवड, स्प्रींकलर तुषार संच, मोटार, पाईपलाईन, ठिंबक  सिंचन अशा विविध योजना व योजनेवर अनुदान असे स्वरूप या योजनेचे आसून यासाठी फक्त पाच हेक्टरच्या अातिल शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेतो येतो, असे कृषी विभाग जिल्हा कृषी अधिक्षक घाडगे, तालुका कृषी अधिकारी जाधव व या योजनेचे मुख्य कंत्राटी कर्मचारी आदमाने, खूळखूळे यांनी शेतकऱ्यांना बजाऊन पाच हेक्टर पुढील शेतकऱ्यांना या योजनेतून बाहेर केले.

शेतकऱ्यांचे म्हणणे व मागणी अशी आहे की, पाच हेक्टरच्या आतच योजनेचा लाभ द्यावा, क्षेत्र जरी पाच हेक्टरच्या जास्त आसले तरी शेतकऱ्यांना योजनेत सामाविष्ठ करण्याची विनंती केली परंतू अधिकऱ्यांची मनमानी वाढल्यामुळे व कंत्राटी कर्मचारी शेतकऱ्यांना उध्दटपणे बोलत असल्याने शेतकऱ्यांची हेळसांड कायम आहे. पाच हेक्टरच्या पुढील शेतकरी होणे हा गुन्हा आहे. का ? क्षेत्र जास्त आसले तरी योजना मर्यादा मध्येच  याही शेतकऱ्यांना समाविष्ठ करण्याच्या मागणीचे निवेदन कृषी मंत्र्यांकडे पाठवण्यात आले असून पाच हेकटर पुढील शेतकऱ्यांंवर अन्याय होत असल्याने या संदर्भात गांर्भीर्याने विचार करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आसून संबंधीत कर्मचाऱ्यांनी आरेरावीची भाषा न करता शेतकऱ्यांना सहकार्याची भूमीका घेऊन काम करण्याची ही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 

 
Top