उस्मानाबाद / प्रतिनिधी:

प्राचीन भारतीय गुरु-शिष्य परंपरा अजूनही टिकून असल्याचा प्रत्यय काल उस्मानाबाद येथे आला शहरातील स्टेट बँकेचे कर्मचारी तथा निवृत्त  नौदल कर्मचारी सिद्धेश्वर प्रसाद जोशी यांचे सुपुत्र वरून जोशी याने हुबळी चे विख्यात शास्त्री गायक पं कृष्णेद्र वाडीकर यांचे शिष्यत्व घेण्यासाठी त्यांच्याकडून विधीवत गंडा बांधून घेतला शास्त्रोक्त पद्धतीने अत्यंत देखण्या स्वरूपाचा हा सोहळा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियम पाळून पार पाडला

त्यानंतर सायंकाळी पंडित कृष्णेद्र वाडीकर यांचे सुश्राव्य गायन उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारे ठरले तसेच शिष्य वरून जोशी याचे गायन आणि तबला वादन कौतुकास पात्र ठरले यावेळी पंडित वाडीकर यांचे कुटुंबीय शनिवार संगीत मंडळाचे सदस्य व संस्कार भारतीचे निवडक सदस्य लातूरचे डॉ सौ वृषाली देशमुख व शशिकांत देशमुख उपस्थित होते वरून जोशी याला संगीताचे मार्गदर्शन करत त्याला योग्य दिशा दाखवणारे आणि त्याच्यात संगीताचे बीज रुजवणारे आनंद समुद्रे यांचा यावेळी सपत्नीक सत्कार केला यावेळी आयोजित मैफिलीत संवादिनीवर सुरेश फडतरे व तबलासाथ हनुमंत फडतरे तंबोरा साथ मंदार चितळे आचार्य यांनी साथ संगत केली अरुण जोशी धनंजय देशपांडे प्रदीप पळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला


 
Top