उस्मानाबाद/ प्रतिनिधी

येथील जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी सहकारी पतसंस्थेने अतिशय उत्तम दर्जाची इमारत बांधली आहे. खूप कमी  पैशात  त्यांनी हे बांधकाम केल्याने  या पतसंस्थेच्या कामकाजातील प्रामणिकता दिसून येते. त्यामुळे या पतसंस्थेचा इतरांनी आदर्श घ्यावा, असे या पतसंस्थेचे काम आहे असे मत राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख  यांनी आज येथे व्यक्त केले.

  या पतसंस्थेच्या शहरातील नवीन इमारतीचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाल्यानंतर झालेल्या समारंभात श्री.गडाख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे होते. यावेळी जि.प.च्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे,जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड,जि.प.चे उपाध्यक्ष धनंजय सावंत,अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाले,जिल्हा उपनिंबधक सहकारी संस्था श्री. देशमुख, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनजंय रणदिवे,श्रीमती  रत्नमाला सोनटक्के आदी उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे प्रस्ताविक शरद मुंडे यांनी केले.यावेळी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्षा बिभीषण जगदाळे,पतसंस्थेसाठी जागा खरेदी करताना पतसंस्थेचे असलेले अध्यक्ष कमलाकर मुंडे,इमारतीचे अभियंता धीरज मोरे,बांधकाम व्यावसायिक निरज काकडे यांचा मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

 
Top