शिराढोण / प्रतिनिधी

वनविभागाकडून पडीक जमीनीवर व शेताच्या बांधावर महात्मागांधी रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड करण्याची योजना वनविभागाने जाहीर केली. संबंधीत तालुक्यातील प्रस्ताव कळंबचे वनाधिकारी सचिन लोंढे यांच्याकडे दाखल केले. जाचक अाटी व कागदपत्राची पूर्तता करता-करता बेजार झालेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव कसे-बसे मंजूर झाले व जून महिन्यात लागवड करण्याचे आदेश वनविभागाने शेतकऱ्यांना दिले. स्वत: रोख पैसे देऊन शेतकऱ्यांनी शासन मान्य रोपवाटीकेतून नगदीने रोपे खरेदी करून वाहनाचे भाडे नगदी देऊन आनले व पावत्या संबंधीत अधिकाऱ्यांकडे जमाही केल्या कळंब महसूल तहसील विभागाने मजूरीची रक्कमेचे केवळ मस्कर काढले. यामध्ये चंदन, सिताफळ, आंबा लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर स्वत: तालुका वनाधिकारी सचिन लोंढे, जिल्हा वनाधिकारी बेडके, तहसीलदार मंजूषा लटपटे, औरंगाबाद विभागाचे मुख्य वनसंरक्षक फुले व वनविभगाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांची प्रत्यक्ष लागवड केली आहे का ?  याची शेतावर जाऊन चार-चार पथकांनी पाहणी सुध्दा केली. परंतू रोपांचे पैसे म्हणजे अकुशल रक्कम आसल्याने तब्बल दोन वर्षापासून ही रक्कम नागपूर कार्यालयाकडून आलीच नाही, अशी माहिती कळंबचे वनअधिकारी सचिन लोंढे यांनी शेतकऱ्यांना दिली. यामुळे कर्ज काढून नगदीने रोपे आणलेल्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सदरील रोपाची रक्कम तातडीने शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी होत आहे. 

 
Top