कळंब ( शिवप्रसाद बियाणी

स्वयंम शिक्षण प्रयोग, उस्मानाबाद, उमेद सखी युनिक रुरल इंटरप्राईस प्रायव्हेट लिमिटेड व   प्रोमथेन पावर सिस्टीम यांच्या संयुक्त विद्यमानाने कळंब तालुक्यातील खडकी व परतापुर येथे महिलांच्या लक्ष्मी डेरीचे उद्घाघाटन करण्यात आले

 ही डेरी उमेद अंतर्गत चालू असलेल्या महिला किसान सशक्तीकरण परियोजना या प्रकल्पांतर्गत करण्यात आली आहे. लक्ष्मी डेअरी ही महाराष्ट्रातील दुसरी व मराठवाड्यातील पहिली महिलांची डेरी अशी तिची ओळख आहे. महिलांचे सक्षमीकरण व्हावे व जास्तीत जास्त महिलांनी दूध व्यवसाय यात उतरावे हा हेतू आहे स्वयंम शिक्षण प्रयोग सखी युनिक रुरल एंटरप्राइज  प्रायव्हेट लिमिटेड प्रोमेथिन पावर सिस्टम यांच्यामार्फत 10 गावांमध्ये लक्ष्मी दूध डेरीसाठी प्रत्येकी 5 लाखाची मदत महिला डेरी उघडण्यात करण्यात आली आहे. लक्ष्मीडेरीचे उद्घाटन जिल्हा अभियान व्यवस्थापक कृषी संगम गोरक्षनाथ भांगे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या कार्यक्रमाला तालुका अभियान व्यवस्थापक सचिन ठोकळ  यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला स्वयंम शिक्षण प्रयोगचे जिल्हा समन्वयक माधव गोरकट्टे प्रोमेथिन पावर सिस्टमचे प्रोक्रूमेंट  मॅनेजर स्वामीराव भोरे तालुका समन्वयक सतीश सूर्यवंशी पशु सल्लागार रघुनाथ  वराळे प्रोमेथिन पावर सिस्टमचे इंजिनीयर किशोर चेमटे पशुवैद्यकीय अधिकारी पांडुळे सर, उमेदचे ताटे सर गावचे सरपंच सचिन हिरे प्रभाग समन्वयक खंडू बरडे विजयकुमार राखुंडे नाना जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या कार्यक्रमांमध्ये भांगे सरांनी महिलांनी घेतलेल्या  दूध डेरी मध्ये घेतला पुढाकार याचे कौतुक केले तसेच शेतीला मुख्य जोडी व्यवसाय हा दुधाचा असल्यामुळे दुधाचा व्यवसाय करण्याचे आव्हान केले. व महिलांची चळवळ अशीच पुढे नेण्याचे आवाहन केले. डॉक्टर रघुनाथ वराळे  यांनी जनावरांचे संगोपन व्यवस्थापन तसेच वातावरणातील बदलामुळे होणारे आजार व त्याचे व्यवस्थापन तसेच वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन केले स्वयम् शिक्षण प्रयोग माधव गोरकट्टे लक्ष्मी डेरीची संकल्पना वैशिष्ट्ये फायदे जनावरांचे संगोपन शासकीय योजनांची जोडणी महिलांच्या नावावर पैसे जमा अशी वेगवेगळी वैशिष्ट्ये समजून सांगितली.प्रोमेथिन पावर सिस्टमचे प्रोक्रूमेंट  मॅनेजर स्वामीराव भोरे दुग्धव्यवसायाला जोड व्यवसाय म्हणून न पाहता मुख्य व्यवसाय करण्याची गरज आहे हे पटवून दिले तसेच दुधाचे उत्पादन व गुणवत्ता वाढवून जास्तीचा फायदा, जनावरांची आरोग्य, उत्पादन खर्च कमी करणे  याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.  या कार्यक्रमाला कृषी सखी   CRP ग्राम संघाचे अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष, तसेच डेरी चालक प्रिय राखुंडे व शीतल जाधव यांनी आपले अनुभव कथन केले व कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार प्रदर्शन बिभीषण राखुंडे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वयंम शिक्षण प्रयोग तालुका समन्वयक सतीश सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे पूर्ण व्यवस्थापन व मोलाचे कार्य केले. 

 
Top