उस्मानाबाद / प्रतिनिधी-

32 वा रस्ता सुरक्षा सप्ताह (अभियान) 2021 दिनांक 18  ते 17 जानेवारी या कालावधीमध्ये जिल्हाभर राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने श्री.गजानन नेरपगार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली खालीलप्रमाणे उपक्रम राबविण्यात आले आहेत.

दिनांक 21 ते 26 जानेवारी 2021 कालावधीत उस्मानाबाद जिल्ह्यांत विविध गुन्हाकरीता विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. सदर कारवाई पथकातील श्रीमती प्रियदर्शनी उपासे, मोटार वाहन निरीक्षक व श्री. श्रीकांत शिंदे, मोटार वाहन निरीक्षक यांनी 65 दोषी वाहनांविरुध्द कारवाई केली आहे. त्यामध्ये अवैध प्रवासी वाहतूक – 07, विनासिटबेल्ट – 17, विना हेल्मेट – 30, मोबाईल संभाषण – 11 वाहनांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.

2. वाशी येथील शिवशक्ती सहकारी साखर कारखाना परिसरात व ईडा ता.भूम येथील बाणगंगा सहकारी साखर कारखाना परिसरातील ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर, ट्रॉली वाहने तसेच बैलगाडी वर रिफ्लेक्टर बसविण्यात आलेत. सदर मोहीमेमध्ये वायूवेग पथकातील श्रीमती प्रियदर्शनी उपासे, मोटार वाहन निरीक्षक यांनी सहभाग घेतला.

 

 
Top