उस्मानाबाद/ प्रतिनिधी

राष्ट्रीय मतदान दिवसाचे औचित्य साधून 25 जानेवारीला उस्मानाबाद जिल्हा परिषदेत राष्ट्रीय मतदान दिवस म्हणून लोकशाहीवर निष्ठा ठेवण्यासाठी शपथ घेण्यात आली. उपस्थितांनी  हात पुढे करून प्रतिज्ञाचे सामूहिक वाचन केले. 

  जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सार्वजनिक सभागृहामध्ये सकाळी 11 वाजता मतदारांसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय तुबाकले, उपकार्यकारी अभियंता (बांधकाम) शेगार, सहाय्यक प्रशासन अधिकारी गिरी, शाखा अभियंता ओ.के. सय्यद, सामान्य प्रशासन विभागातील सय्यद,वरिष्ठ सहाय्यक मधुकर कांबळे यांच्यासह जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुख, अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top