तुळजापूर/ प्रतिनिधी

श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान विश्वस्तांचा  गुरुवार दि. २८ रोजी झालेल्या बैठकीत गर्दीचा दिवशी ३० हजार
मोफत दर्शन पास व पेड दर्शन प्रतिभाविक २०० रूपये करण्याचा निर्णय घेण्यात आला,आशी माहीती नगराध्यक्ष तथा विश्वस्त सचिन रोचकरींनी दिली. 

या निर्णयामुळे आता  जास्तीत- जास्त भाविकांना देवीदर्शनाचा लाभ मिळणार आहे.श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त आ. राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, उपविभागीय अधिकारी खरमाटे तसेच तहसिलदार सौदागर तांदळे यांच्या उपस्थितीत बैठक होवुन त्यात १७ विषयांन पैकी बहुतांशी विषयांनवर निर्णय घेण्यात आला .

यात कोरोना पार्श्वभूमीवर सध्या भाविकांना प्रतिदिन १२ हजार भक्तांना मोफत दर्शन पासेस वितरीत होते यावर आमदार राणजगजितसिंहजी पाटील व नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी मोफत जादा पासेस वितरीत करण्याची मागणी केली असता यावार चर्चा होवुन आता इतर दिवशी २० हजार व गर्दीच्या दिवशी ३०  हजार मोफत दर्शन पासेस वितरीत करण्याचा निर्णय झाला तसेच पेडदर्शन प्रतिभाविक ३०० ऐवजी २०० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच देविचे धार्मिक विधी सुरु करण्याबाबतीत १५ फेंबुवारी पर्यत निर्णय घेण्याचे ठरले.

तसेच देविदर्शन करुन बाहेर पडण्यासाठी अरुंद मार्ग असुन येथे स्काँय उभारण्यासाठी व्यवस्थित प्रस्ताव व ईस्टीमेट सादर करुन यात पुढील बैठकीत चर्चा करण्याचे ठरले.श्री तुळजाभवानी मंदीरात पदनिर्मिती बाबतीत चर्चा होवुन उपजिल्हाधिकारी दर्जाचा सेवानिवृत्त किंवा सेवेत असलेल्या अधिकारी घेण्याबाबतीत चर्चा होवुन शासन मान्यते नुसार भरण्याचा निर्णय झाला. सध्याचे सुरक्षारक्षक कंपनी बीव्हीजी येथे काम करण्यास तयार नाही त्याऐवजी महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ( मेस्को )व महाराष्ट्र सेक्युरेटी प्रा.ली  चे सुरक्षा रक्षक घेण्यावर चर्चा झाली व यावर पुढील बैठकीत चर्चा करण्याचे ठरले. श्री तुळजाभवानी आभियांञिकी महाविद्यालयास भौतिक सुविधेसाठी आजपर्यत २८ कोटी दिले असुन पगारीसाठी आणखी १ कोटीची मागणी होत आहे. यावर ही सखोल चर्चा झाली

मंदीर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगचा फरक 2कोटी20लाख रुपये द्यावे लागणार आहेत. यावरही चर्चा झाली  तसेच आकृतीबंद नुसार व्यवस्थापक, सरव्यवस्थापक,रोखपाल, भांडारपाल सह अन्य पदे भरण्या बाबतीत चर्चा होवुन यावर पुढील बैठकीत चर्चा करण्याचे ठरले.तसेच श्री तुळजाभवानी मंदीरसाठी पाच किंवा तीन विधीज्ञ समिती कार्यान्वित करण्या बाबतीत चर्चा झाली .

श्रीतुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय सैनिक शाळा व मंदीर येथील कार्यरत असणारे कर्मचारी अदलाबदलाचा अधिकारी, तहसिलदार यांच्या कडे प्रदान करण्यात आला.श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचा वतीने तिर्थक्षेञ तुळजापूर येथे सुपरस्पँशालिस्ट हाँस्पीटल उभारण्याचा प्रस्ताव शाषणाकडे पाठवण्या बाबतीत चर्चा होवुन  यावर पुढील बैठकीत आणखी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना काळातील मंदीराचा जमाखर्च आढावा घेतला असता जमा ८ कोटी ९१ लाख झाले तर खर्च ८ कोटी ९७ लाख रुपये झाल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.

 
Top