कळंब / प्रतिनिधी:

धर्मनाथ बीज गणेश जयंती, रती कामदेव वसंत पंचमी निमित्त विश्वविक्रमी भव्य राज्यस्तरिय भजन स्पर्धा शनिवार १३ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी या कालावधी मध्ये गाडेगाव ता. बार्शी येथे होणार आहेत. या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे , असे आवाहन संयोजक योगीराज पाटील यांनी केले आहे.

    प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी कोरोणा चे सर्व नियम पाळून या स्पर्धा गाडेगाव ता. बार्शी येथे होत असून या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस पंचवीस हजार ,द्वितीय पारितोषिक पंधरा हजार रुपये, तृतीय बक्षीस अकरा हजार रुपये , तसेच तबला वादक, हार्मोनियम वादक व उत्तम गायक यांच्यासाठी भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

    या स्पर्धेसाठी १० फेब्रुवारी पर्यंत नाव नोंदणी करावी, स्पर्धेसाठी पस्तीस मिनिटांची वेळ आहे. मंडळाने दोन अभंग व एक गवळण सादर करावी , भजनी मंडळासाठी येण्या जाण्याचा खर्च दिला जाणार आहे, मंडळाने वाद्य सोबत आणावे या स्पर्धा योगीराज निवास गाडेगाव येथे होणार असून. यासाठी योगीराज पांचाळ महाराज(९८८१५१४३१३) व लक्ष्मीकांत गरड(९७६३०९५१८७) , तुळशीदास मस्के (९४२०२००१२०) यांच्याशी संपर्क साधण्याचे अवाहन संयोजकांनी केले आहे.


 
Top