परंडा / प्रतिनिधी : -
 जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये शिवसेनेचे उपनेते आमदार डॉ.तानाजीराव सावंत यांनी विकास कामाच्या मुद्द्यावर चर्चा करताना मराठवाड्याला हक्काचे २१ टीएमसी पाणी मिळवून देण्यासाठी भिमा - निरा स्थिरीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आग्रही व निर्णायक भुमीका घेतली आहे. या बैठकीत सर्व प्रथम मुख्यमंत्री ठाकरे यांचा अभिनंदनाचा ठराव घेण्याची मागणी केली होती, त्यानतंरच जलसंपदा मंत्री यांच्या अभिनंदनाचा ठराव घ्या अशी मागणी केली होती. मात्र त्यांच्या मागणीचा विपर्यास करण्यात आला. पक्षात कसलीही गटबाजी नसल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम लटके, जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. या बैठकीत शिवसेना उपनेते आमदार डॉ. तानाजी सावंत यांचे प्रसिध्दी पत्र सादर करण्यात आले. 
आमदार सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, काही नतद्रष्ट मंडळीने सभागृहातील कामकाजाचा विपर्यास करून बातम्या छापून आणण्याचा कुटील कारस्थान रचण्याचा प्रयत्न चालवला आहे. सभागृहामध्ये होत असलेल्या जिल्हा नियोजन बैठकीत जिल्हा नियोजन मधील निधी वाटप लोकसंख्ये प्रमाणे व्हावे कुठल्याही तालुक्यावर अन्याय होऊ नये, महावितरण कडून शेतकऱ्याच्या मागणीकडे संपूर्ण दुर्लक्ष होत आहे.पिकांना पाणी देण्यासाठी विजेची गरज आहे त्यासाठी अधीक्षक अभियंता यांनी लक्ष देणे गरजेचे आहे मात्र तसे होताना दिसत नाही. महावितरण विभागाला खात्याकडून लवकर पैसे मिळणार नाही त्यासाठी नियोजन मंडळाने महावितरणला देखभालीसाठी जादा निधीची तरतूद करावी, अतिवृष्टी झालेल्या तालुक्यामध्ये जादा निधीची तरतूद करावी. एका सदस्याने नीरा-भीमा स्थिरीकरण योजना मार्गी लावण्यासाठी फक्त जलसंपदामंत्री यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला त्यामध्ये मी दुरुस्ती सुचवून मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री यांनी खास बाब म्हणून अतिशय तातडीने विभागाची बैठक लावून लवकरात लवकर मराठवाड्याला पाणी मिळाले पाहिजे त्याची सविस्तर माहिती मी नियोजन मंडळ यांना दिली व पहिले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा अभिनंदनाचा ठराव घेण्याची सूचना हट्ट झाला मला वाटते यामध्ये पक्षविरोधी अथवा सरकार विरोधी भूमिका वाटण्याचे काहीच कारण नाही. कारण प्रशासनामध्ये जर ढिलाई होऊन जनतेचे प्रश्न सुटणार नसतील तर लोकप्रतिनिधींनी त्यावेळेस प्रशासनास सोडवण्याची गरज आहे असे माझे मत आहे. त्यामुळे प्रशासन झाले याचा दोष सरकार वरती येऊ नये याची काळजी आम्ही घेतोय कृपया याची नोंद घ्यावी कुठल्याही वक्तव्याचा विपर्यास करू नये असा खुलासा आमदार डॉ.तानाजीराव सावंत यांनी सादर केला आहे. या पत्रकार परिषदेत शिवसेना तालुका प्रमुख आण्णासाहेब जाधव, माजी प.स. उपसभापती सुधाकर कोकाटे, पोपट चोबे, सतिष मेहेर आदी उपस्थित होते.

 
Top