परंडा / प्रतिनिधी - 

वंचित बहुजन आघाडी परंडा तालुक्याच्या वतीने राज्यात पेट्रोल डिझेलची झालेली दरवाढ व कोरोना लॉकडाउन काळातील विजबील माफ करण्यासाठी रस्ता रोखो आंदोलन करण्यात आले.

 वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के व सहसचिव मोहनदादा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. राज्यात पेट्रोल-डिझेलची भरमसाठ दरवाढ झाल्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य जनतेस मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे तसेच पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनते मधून मोठ्या प्रमाणात राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.तसेच लॉकडॉऊन काळातील विजबील तात्काळ माफ करण्यात यावे यासाठी परंडा शहरात वंचित बहुजन आघाडी च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक परंडा येथे जनहितार्थ लोकशाही मार्गाने परंडा करमाळा रोड रोखून धरत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.त्यामुळे परंडा करमाळा रोडवर दुतर्फा कांही काळ ठप्प झाला होता या प्रसंगी जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के, सहसचिव मोहनदादा बनसोडे तालुकाध्यक्ष दिपक ओव्हाळ ,तालुका महासचिव दयानंद बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष दिपक ओव्हाळ,तालुका महासचिव दयानंद बनसोडे,तालुका प्रवक्ता रणधीर मिसाळ,तालुका संघटक मधुकर सुरवसे,तालुका सचिव हरीश पवार, किरण बनसोडे भाग्यवंत शिंदे आरुण सोनवण, अॅड. उमेश चंदनशिवे, आनंद निकाळजे, पांडूरंग समिंदर, महेश परीहार, दिलीप सुरवसे, एस.व्ही कांबळे,  समर ओव्हाळ, मधुकर ओव्हाळ आदी कार्यकर्ते , पदाधिकारी उपस्थीत होते. 


 
Top