उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सभाग्रहात समितीचे विद्यमान सभापती कै अरुण आप्पासाहेब वीर यांचे अपघाती दुःखद निधन झाल्याकारणाने समितीचे सभापती पद रिक्त झाले होते. सदर सभापती पदावर दि. 27 जानेवारी 2021 रोजी दत्तात्रय विनायक्राव देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली.

सदर निवडीचे कामकाज व्ही एम जगदाळे सभा अध्यक्ष तथा प्राधिकृत अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती उस्मानाबाद तसेच समितीचे प्रभारी सचिव एस डी माने यांनी कामकाज पाहिले सदर सभेस  समितीचे सदस्य युवराज शिंदे, तानाजी गायकवाड, निहाल काजी ,उद्धव पाटील, जीवन हिप्परकर, गोपाळा अधटराव, श्रीराम घोडके , अविनाश चव्हाण, सौ. बबीता माने, सौ. रत्नमाला शिंगारे, सौ. रोहिणी नाईकवाडी व कर्मचारी सभेस उपस्थित होते.

 
Top