परंडा / प्रतिनीधी
परंडा तालुक्यातील अनाळा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. रविवार दि.३ रोजी अनाळा येथील उमेद अंतर्गत येणाऱ्या समूहातील महिलांनी एकत्र येऊन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन केले. यावेळी समुहातील महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास उमेद अंतंर्गत समुहाच्या प्रेरिका नौशाद शेख, रेणुका सुर्वे, समृद्धी ग्रामसंघाच्या लिपिका सविता बल्लाळ, शालन सरवदे, भाग्यश्री कांबळे, वनमाला क्षिरसागर, आसिफा शेख, राजश्री उगले, अनिता काटकर, वनमाला किर्तने, गीताबाई गोडसे व बालिका उपस्थित होत्या.
