उस्मानाबाद /प्रतिनिधी:-

महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती परिषद आयोजित राज्यस्तरीय व्यसनमुक्ती कार्यशाळा व राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळा गुरुवार दिनांक 31 डिसेंबर रोजी येडाई व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र येरमाळा येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक, सामाजिक संस्था, व्यसनमुक्ती कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदवला.

 कार्यशाळेच्या पहिल्या सत्रामध्ये ‘व्यसनमुक्ती विषयक उपक्रम’ व ‘व्यसनमुक्ती उपचार पद्धती’ या विषयावर महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर संदीप तांबारे.डॉक्टर सुधाकर गुळवे (लातूर), शशिकांत बदाने (नगाव), कुमार देशमुख (हिंगोली) डॉक्टर विजयकुमार यादव (लातूर) या मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तर द्वितीय सत्रात ‘व्यसनमुक्ती  कार्यातील अडचणी’ विषयावर डॉक्टर संदीप तांबारे यांनी मार्गदर्शन केले संस्कृतीक कार्यक्रमात अशिष झाडके व सौ शिवानी झाडके यांच्या पथकाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमात रंगत आणली.

  तर शेवटच्या सत्रात व्यसनमुक्ती क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या  74 जणांना ट्रॉफी , प्रमाणपत्र देऊन राज्यस्तरीय पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी कार्यक्रमासाठी पाठविलेल्या शुभ संदेशाचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना महाराष्ट्र राज्य  व्यसनमुक्ती परिषदेचे सचिव अजिनाथ शेरकर यांनी केले तर आभार डॉक्टर रेवती घाडगे यांनी मानले.

  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रुती जाधव, देवकन्या मकवान, सुजित ढेकळे, नानासाहेब देशमुख ,शिवाजी माने, पांडुरंग मते, प्रदीप लोंढे, शिवाजी माने ,प्रदीप लोंढे बापुराव हुलुले, वर्षा शेरकर .राजेश तामाने व येडाई व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्रातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

या मान्यवरांना मिळाला पुरस्कार.

विनोद गणपतराव  गजघाटे (नागपूर) ,रिता संजय कोगरे (नागपुर), अनुपमा नायडू (मुंबई), मृणाली मोरे (उस्मानाबाद) सूर्यप्रकाश गजानन गभणे (गडचिरोली) ,उषा शीलवंत घोडेस्वार (भंडारा), तत्वशिल बाबुराव कांबळे (बीड ),अंजली बाबुराव पाटील (बीड), राजू रामदास मेश्राम (चंद्रपूर), योगिता धिरज शर्मा (अहमदनगर),बरबडे श्रीराम संजय (अहमदनगर) प्रवीण श्रीराम गायकवाड (बीड ), बागेश्री विनोद माने (कोल्हापूर), मिलिंद ग शिंदे (कोल्हापूर), शिवप्रसाद दीपक पिंपळकर (कोल्हापूर) डॉक्टर सय्यद बशीर (बीड) पियुष दीपक ठवरे (भंडारा), दुर्वास खोब्रागडे (चंद्रपूर), राम सुधाकर परजने (बीड) ,भाग्यश्री गुणवंतराव बोबडे (अमरावती ),शिवाजी दयानंद मगर ( उस्मानाबाद), आनंत शामराव कुलकर्णी ,नागनाथ महादेव भडकुंबे (उस्मानाबाद),आझम हाश्मी  (नागपूर ),माया अरुण गवळी (लातूर ),माहेश्वरी सोपान तादलापुरकर (नांदेड), संतोष गणपती राजपंखे (लातूर), सुशील सुधाकर जोगदंड (बीड), बिपिन रामकिसन कांबळे (बीड ),विनायक प्रभाकर परकाळे (पुणे), मोहिनी मधुकर कोबाळे (पुणे), अरुण पांडुरंग वाघमारे (पुणे), अमोल गोंदवले (उस्मानाबाद), संजय मनोहर कुंबेफळकर (बीड) कैलास रामचंद्र गायकवाड (नांदेड), रोशन गणेश कामाडी (गडचिरोली), अपर्णा खुशाल बोधनकर (अकोला)आधीसह 74 जणांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


 
Top