आयोध्या येथील आदर्श असलेल्या मर्यादापुरुषोत्तम श्रीरामांच्या जन्मभूमीवर भव्य मंदिर उभारणीच काम गतीने सुरू झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल आणि त्यानंतर झालेल्या भुमीपुजन समारभानंतर आता मंदिर निर्माण कार्यालयाला सुरुवात झाली आहे. या भव्य मंदिराच्या निर्माणाच्या कार्यात आधकाधिक राममक्ताचे योगदान झाले पाहीजे या साठी येत्या मकर संक्रातीपासन 1 महिन्यात विशेष अभियान घेण्यात येणार असुन जिल्हयातील 2 लाख घरांशी संपर्क साधुन त्यांच्याकडून खारीचा वाटा जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती उस्मानाबाद जिल्हा श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण समितीचे जिल्हा सचिव श्रीकृष्ण धर्माधिकारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शुक्रवार दि. ८ जानेवारी रोजी हॉटेल समर्थच्या हॉलमध्ये घेण्यात आलेल्या या पत्रकारिषदेत समितीची घोषणा करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षस्थानी महंत तुकोजीबुवा, तुळजाभवानी मंदिराचे मुख्य पुजारी हे राहणार आहेत, असे सांगून श्रीकृष्ण धर्माधिकारी यांनी जिल्हा समिती जाहीर केली. या समितीमध्ये अनिल यादव, बोधले महाराज, लवटे महाराज, महेश महाराज, गंगाधर महास्वामीजी, विजयकुमार वाघमारे, श्रीराम किसनराव पुजारी यांच्यासह व्यापारी व इतर हिंदु संघटनेचे प्रतिनिधी सदस्य म्हणून घेतले आहेत. दत्तात्रय चौरे, शेषाद्री डांगे, सुरेद्र मालशेटवार, डॉ.उदय मोरे, सुनिल माने, मंहत मावजीनाथ बुवा, हभप शाम चैतन्य महाराज, कांतीलाल बोराना, प्रताप देशमुख, डाॅ.अजित नायगावकर आदी २१ सदस्यांचा समावेश आहे.
भव्य मंदिराची उभारणी करताना त्या देशातील गावोगावच्या अधिकाधिक नागरीकांचे योगदान व्हावे आणि त्याच्या भावना जोडल्या जाव्यात या हेतूने येत्या मकर संक्रातीपासुन महिनाभरात घरोघरी जाऊन राम भक्त कार्यकर्ते निधी समर्पण जमा करणार आहेत. जमेल तेवढा निधी प्रत्येक कुटुंबाला समर्पत करता यावा यासाठी 10 रु. 100 रु व 1000 रु.चे कुपण काढण्यात आले असुन त्यावर असलेले नियोजीत श्रीराम मंदिराचे आकर्शक चित्रही त्या कुपनमुळे घरोघरी जाणार आहे. हे अभियान 15 जानेवारी पासून 15 फेवारी पर्यंत चालनार आहेत. या अभियानाच्या आधी तयारीसाठी जिल्ह्यामध्ये येडशी येथे संत संम्मेलन 10 जानेवारी राेजी होणार आहे. अभियान काळात काेरोनाच्या संख्येची मर्यादा पाळुन सर्व ठिकाणे मिरवणुक, भजन, किर्तन, रथयात्रा काढुन अभियानाची सुरवात होणार आहे.
या पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक व आभार अॅड.महेंद्र देशमुख यांनी मानले.

