तुळजापूर  / प्रतिनिधी-

भाविकांकडून शिद्यात चुकून आलेले अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने भाविकांना प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल पुजारी सोमनाथ अमृतराव (कदम) यांचा तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील गाजपूर येथील विष्णू घुले या भाविकाचे नैैवेद्यासाठी आणलेल्या शिद्यात चुकून आलेेले अडीच तोळ्याचे सोन्याचे नेेेकलेेस पुजारी सोमनाथ अमृतराव (कदम) यांनी प्रामाणिकपणे परत केले आहे. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. दरम्यान, पुजारी सोमनाथ अमृतराव यांचा पुजारी मंडळाच्या वतीने फेटा बांधून, पेढे भरवून सत्कार करण्यात ाला. यावेळी पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष विपीन शिंदे यांच्यासह प्रा. धनंजय लोंढे, नरेश अमृतराव, अविनाश गंगणे, अजित क्षीरसागर, अण्णा रोचकरी आदी संचालक उपस्थित होते.


 
Top