तुळजापूर / प्रतिनिधी-
तिर्थक्षेञ तुळजापूर येथील श्रीतुळजाभवानी मंदीरात मंगळवार दि २८रोजी उपदेवता असलेल्या श्रीदत्त मंदीरात श्रीदत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने पारंपारिक पध्दतीने धार्मिक विधी होवुन संपन्न झाला.
हजारो भक्तांनी श्रीतुळजाभवानी दर्शनानंतर श्रीदत्ताचे दर्शन घेण्यासाठी श्रीदत्त मंदीरात गर्दी केली होती. श्रीतुळजाभवानी मंदीरात असणाऱ्या श्रीदत्त मंदीरातील मुर्तीस पंचामृत अभिषेक केल्यानंतर श्रीदत्त मुर्तीस वस्ञोलांकार घालण्यात आले नंतर दुपारी १२ वाजता श्रीदत्त जन्मोत्सव सोहळा भाविक -भक्तांचा उपस्थितीत पार पडला नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला.यावेळी देविचे मंहत हमरोजी बुवा, मंहत वाकोजीबुवा, देविचे सेवेकरी श्रीदत्त मंदीराचे पुजारी अण्णा चोपदार पाठक उपस्थितीत होते.
