उस्मानाबाद / प्रतिनिधी-
काँग्रेसच्या १३६ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कार्यालयात झेंडावंदन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, संघटक राजेंद्र शेरखाने, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, सेवा दलाचे अध्यक्ष विलास शाळू, प्रशांत पाटील, शहाजी मुंडे, माजी नगरसेवक दर्शन कोळगे, युवकचे प्रदेश सचिव उमेश राजेनिंबाळकर, माजी सचिव जावेद काझी, प्रणित डिकले, धनंजय राऊत, असंघटित कामगार जिल्हाध्यक्ष देवानंद येडके, कानिफनाथ देवकुळे, विधी विभागाचे विश्वजित शिंदे, गणपती कांबळे, राहुल लोखंडे, मेहराज शेख, प्रेम सपकाळ, इम्रान हुसेनी उपस्थित होते. यावेळी मध्यवर्ती शिवजयंती समितीच्या अध्यक्षपदी आशिष मोदाणी यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी काँग्रेस स्थापना दिनाचा थोडक्यात इतिहास सांगून मार्गदर्शन केले. स्वातंत्रयपूर्व काळात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाचे योगदान महत्वाचे होते. त्यांचे तसेच महात्मा गांधी यांच्या बतिदानाचे स्मरण आपण केले पाहिजे. सध्याच्या तरूण पिढीने काँग्रेसचा हा इतिहास स्मरण केला पाहिजे. स्वतंत्र्यानंतरही काँग्रेसचे योगदान मोठे असल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांनी केले तर आभार विलास शाळू यांनी मानले.
