शिराढोण/ प्रतिनिधी-
शिराढोणची बीएसएनएल सेवा पुर्णत: कोलमडली आसून संबंधीत कार्यालयात कर्मचारीस नसल्याने तक्रार करावी तरी कोणाकडे, कळंबचे अभियंता मात्र या गंभीर समस्याकडे जाणुनबुजून कानाडोळा करत असल्याने बीएसनएल कार्डधारक ग्राहकांवर फोर जी सेवेचे रीचार्ज घेऊन सेवा मिळत नसल्याने दि. २५ जानेवारी पर्यंत सेवा सुरूळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थंनी कळंबचे नॉट रीचेबल अभियंता ठाकूर व कर्मचारी उबाळे यांच्याकडे निवेदनासह दिला आहे.
सतत इंटरनेटसेवा बंद, सतत मोबाईलसेवा बंद यामुळे ग्राहकात संताप व्यक्त होत आहे. तसेच इंटरनेटच्या ऑनलाईन सेवा बंद पडल्याने विद्यार्थ्यांसह शेतकरी व ग्राहक वैतागले आहेत.
