शिराढोण/  प्रतिनिधी- 

कळंब तालुक्यातील शिराढोण ते मुरूड हे १८ कि.मी. रस्त्याचे नुकतेच डांबरीकरणाचे काम पुर्ण झाले परंतू केवळ तीन महिन्यात रस्ता पुनहा उखडला. रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले. संबंधीत बांधकाम विभागाचे अभियंता व गुत्तेदार यांच्या भ्रष्ट कारभाराने शासनाची तिजोरी मोकळी होत आसूनही दर ६ महिन्यात पुन्हा-पुन्हा त्याच रस्त्याची दुरूस्ती, गुत्तेदार तोच, रस्ता तोच परंतू समस्या कायम यामुळे निष्कृष्ट कामे फोफावत आहेत.

सदरील डागडूजीचे काम आठवड्यातून केवळ दोन दिवसच  रेंगाळत सुरू असल्याने सामान्य जनता या आनागोंदी कारभारास पूर्णता : वैतागली आसून ग्रामीण समस्यांना कोणवाली आहे का असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 

 
Top