उस्मानाबाद / प्रतिनिधी:
चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी मनोज मुरलीधर सावंत (रा. सांजा, ता. उस्मानाबाद) हा जामिनावर सुटल्यानंतर सुनावणीप्रसंगी गैरहजर राहत होता. त्याचा ठावठिकाणा पोलिसांना लागत नसल्याने ६ वर्षे पोलिस त्याचा शोध घेत होते. तपासादरम्यान तो सातारा जिल्ह्यात राहत असल्याचे समजल्याने सपोनि निलंगेकर, पोकॉ पांडुरंग सावंत, अशोक ढगारे यांच्या पथकाने मंगळवारी त्यास सातारा जिल्ह्यातून ताब्यात घेतले. त्याला पुढील तपासकामी उस्मानाबाद शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
