उस्मानाबाद / प्रतिनिधी:

अवैध बांधकाम करणाऱ्या दोघांवर उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. अनधिकृत बांधकाम प्रकरणी शहरातील तौफीक पठाण (रा. हनुमान चौक, बार्शी रोड), तसेच बालाजी जनक कुंभार (रा. तांबरी विभाग) यांना उस्मानाबाद नगरपालिकेतर्फे महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम कलम-५३(१) अंतर्गत नोटीस देण्यात आली होती. त्यात अवैध बांधकाम काढून टाकावे किंवा खुलासा सादर करावा, असे सुचित करण्यात आले होते. परंतु नोटीस मुदत संपली तरी खुलासा न आल्याने नगरपालिकेचे कर्मचारी सुनिल कांबळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या तक्रारीवरून नमूद कायद्यांतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केल आहेत.

 
Top