उस्मानाबाद / प्रतिनिधी:
जिल्ह्यात एका गावातील १७ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली. मुलीच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि.२८) पहाटे मुलगी घरात आढळली नाही. त्यानंतर नातेवाइकांनी तिचा शोध घेतला. मात्र, तिचा तपास लागला नाही. अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण केले असल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दिली आहे.
