कळंब  / प्रतिनिधी

 मनुष्यबळ विकास अकादमी मुंबई यांच्या मार्फत राज्यातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांना सन्मानित करण्यात येते अशाच पुरस्कारासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोलेगाव ता. वाशी जि.उस्मानाबाद शाळेतील मुख्याध्यापक श्री मुकुंद विष्‍णु मेदने यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुणगौरव शिक्षकरत्न पुरस्कार-2020 या पुरस्कारासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातून त्यांची निवड झालेली आहे. 

या पुरस्काराचे वितरण 26 नोव्हेंबर 2020 रोजी मुंबई येथे होणार आहे. मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरवपदक, सन्मानचिन्ह ,मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सरांचे शैक्षणिक, सामाजिक कार्य उत्कृष्ट असल्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे .या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


 
Top