वाशी / प्रतिनिधी
ग्रामीण रुग्णालय वाशी येथे रुग्णकल्याण समितीची बैठक दि. ०३ नोव्हेंबर रोजी पार पडली. ही बैठक संपल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते रुग्णालय परिसरामध्ये वृक्षारोपन कार्यक्रम घेण्यात आला व त्यानंतर ग्रामीण रुग्नालयास पूरवठा करण्यात आलेल्या पोर्टेबल डिजीटल एक्स - रे मशीनचे नागनाथजी नाईकवाडी , नगराध्यक्ष - नगरपंचायत वाशी तात्यासाहेब गायकवाड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी , डॉ . महेन्द्रकर जी. आर., नगरपंचायतचे प्रतिनिधी गोपीनाथ घुले एकात्मिक बालविकास कार्यालयातील श्रीमती नैना सुतार व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी वैद्यकिय अधिक्षक डॉ. कपीलदेव पाटील व वैद्यकिय अधिकारी डॉ. विजयकुमार सूळ यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
