उस्मानाबाद / प्रतिनिधी-
डॉ बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाण्याच्या सन 2020 दीपावलीच्या सभासद साखर वाटपाचा शुभारंभ कारखान्याचे लाभधारक सभासद डॉ. हेश वाघमारे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून उस्मानाबाद येथील जिल्हा स्टेडियम पाटील प्लाझा याठिकाणी उत्साहात करण्यात आला.
याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री. विलास भुसारे साहेब तसेच कारखान्याचे संचालक ॲड निलेश बारखडे पाटील, श्री.दिलीप गणेश, करीम कुरेशी , उमाकांत माळाळे, श्री.दिलीप पाठक नारीकर , ॲड. सुधाकर तांबे , ॲड. अक्षय देशपांडे साहेब, ॲड. नितीन भोसले साहेब, ॲड. अमोल वरुडकर साहेब, ॲड. समाधान टेकाळे तसेच कारखान्याचे शेतकरी औरशहर अतुल चव्हाण , श्री. जाधव, श्री. पडवळ, श्री. गोरे तसेच कारखान्याचे सभासद आदींची उपस्थिती होती.