परंडा/ प्रतिनिधी : - 

परंडा तालुक्यातील भोंजा हवेली येथील जनावरांना १०० वर्षापूर्वीचा लम्प्या रोग मुक्त करण्यासाठी लस टोचणे चालू असून दि.१ रविवार रोजी एकूण ९५ जनावरास पशु संवर्धन विभागा कडून लस टोचण्यात आली आहे. 

 पशु संवर्धन विभागाकडून भोंजा येथील ९५ जनावरांना लस टोचून झाली असुन उर्वरित जनावरांना आज रोजी पासून लस टोचण्याचे कामचालू आहे. तरी शेतकरी यांनी आपल्या जनावरातील संसर्गजन्य रोग पसरू नये म्हणून १०० वर्षापूर्वीचा लम्प्या रोग मुक्त करण्यासाठी  जनावरांना लस टोचून घ्यावी असे आवाहन पशु संवर्धन विभागाकडून केले आहे.पशु संवर्धन चे सर्वेसर्वा डाॅ.आर.पी. पाटील,डाॅ.मुळीक व डाॅ.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरणाची मोहिम राबविण्यात येत आहे.

 यावेळी डाॅ.एस.जाधव, डाॅ.संदेश शिंदे, अध्यक्ष तथा विद्यमान संचालक गणेश नेटके, पै.दादासाहेब मोरे आदी उपस्थित होते.


 
Top