उस्मानाबाद/ प्रतिनिधी

राज्यात अनेक तास एकत्र बसून बस, रेल्वे व विमानसेवेचा प्रवास चालू आहे. परंतु, धार्मिक स्थळे मात्र भाविकांसाठी खुली केली नाहीत. जन भावनेचा आदर करत भाविकांसाठी धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, संत परंपरेचा वारसा लाभलेल्या राज्यात मागील ७ महिन्यांपासून धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद आहेत. ज्या भवानी मातेच्या आशीर्वादाने हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली त्या महाराष्ट्राच्या कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मातेचे मंदिर देखील बंदच आहे. इतर राज्यातील धार्मिक स्थळे खुली असताना महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे खुली करण्यास काय अडचण आहे, असाही प्रश्न आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.


 
Top