उस्मानाबाद/ प्रतिनिधी

येथील गुणवंत धोंडोपंत चौधरी (84) यांचे काल रविवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रात्री कपीलधार स्माशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गुणवंत चौधरी हे माजी मुख्याध्यापक होत, विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे इंग्रजी विषयावर विशेष प्रभुत्व होते. त्यांच्या पश्चात 3 मुले, 1 मुलगी, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील श्रीकृष्ण महाविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक प्रमोद चौधरी, उस्मानाबाद येथील व्यंकटेश महाजन वरीष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत चौधरी व प्रविण चौधरी यांचे ते वडील होत.


 
Top