उस्मानाबाद / प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री.संत गोरोबा काका यांच्या वाडयाच्या माळवदाचा खांब पडला असून या वाडयाच्या नित्कृष्ट बांधकाम प्रकरणी सबंधित अधिकारी व गुत्तेदार यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी तेर येथील कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तु संग्रहालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा तेर येथील अजित कदम यानी निवेदनाव्दारे पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक याना दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की,उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे संत श्रेष्ठ गोरोबा काका यांचा वाडा असून पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली आहे. या वाडयाच्या बांधकामासाठी दोनदा निधी देऊनही 1 नोंव्हेबर 2020 रोजी राञी माळवदाचा लाकडी खांब पडला आहे.त्यामुळे या वाडयाचे काम अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे झालेले असल्याने लाकडी मंडपाचे इतरही खांब पडण्याची शक्यता आहे.त्यामुळे संबधित पुरातत्व विभागाचे  अधिकारी व संबधित गुत्तेदारावर  कारवाई करावी नसता  तेर येथील कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तु संग्रहालयासमोर 10 नोंव्हेबरला उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनाव्दारे तेर येथील अजित कदम यानी पुरातत्व व वस्तुसंग्रहालयचे संचालक यांना दिला आहे.निवेदनाच्या प्रति पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक औरगाबाद, जिल्हाधिकारी उस्मानाबाद,तेर दुरक्षेञ,कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तु संग्रहालय तेर  यांनाही दिलेल्या आहेत.

 
Top