उस्मानाबाद/ प्रतिनिधी

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शाळांमध्ये अध्ययन-अध्यापन प्रक्रिया आनंददायी व सुलभ होणेसाठी नवोपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाची माहिती सर्व शिक्षकांना व्हावी. या दृष्टीने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांचेमार्फत सन 2020-21 या वर्षासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजीत करण्यात येत आहे.

या स्पर्धेत नवोपक्रम अहवाल लेखनामध्ये नवोपक्रमाचे नेमके नाव, गरज व महत्त्व, उद्दीष्टे, नियोजन, कार्यपध्दती,उद्दीष्टानुसार फलनिष्पत्ती ,समारोप, संदर्भ सुची व परिशिष्टे यास अनुसरून लेखन असावे. नवोपक्रम अहवाल हा सन 2019-20 किंवा सन 2020-21 मध्ये राबविलेला असावा.

स्पर्धा पूढील 5 गटात आयोजीत करण्यात येत आहे. पूर्वप्राथमिक गट (अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका),प्राथमिक गट (सहशिक्षक, पदविधर शिक्षक व मुख्याध्यापक),माध्यमिक, उच्च माध्यमिक गट (माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक),विषय सहाय्यक व विषय साधनव्यक्ती गट,अध्यापकाचार्य व पर्यवेक्षीय अधिकारी गट (अध्यापकाचार्य, केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता)  या स्पर्धा ऑनलाईन पध्दतीने आयोजीत करण्यात येत आहे. सृजनात्मक कार्याची आवड असणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी प्राचार्य, डायट उस्मानाबाद, तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांचेशी संपर्क साधावा.

अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांनी innovation.scertmaha.ac. in या लिंकवर दि. 10 नोव्हेंबर-2020 पर्यंत आपले नवोपक्रम अहवाल सादर करण्यात यावेत, असे आवाहन शिक्षण विभाग (प्राथमिक), जि.प. उस्मानाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे.


 
Top