उमरगा / प्रतिनिधी- 

उमरगा तालुक्यातील गुंजोटी पंचायत समिती गणातील औराद येथे लंपीस्किन आजाराच्या पार्श्वभूमीवर लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ४१३ जनावरांना लंपिस्किन व खरखुत आजाराबाबत लसीकरण करून टॅग मारण्यात आले व जनावरांची ऑनलाईन नोंद करण्यात आली. यावेळी या शिबिराचे उदघाटन समर्पण सामाजिक संस्थेचे किशोर व्हटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कदेर पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन पर्यवेक्षक किरण आरेकर, गणेश चौधरी, विनोद पाटील, औराद शिवसेना शाखाप्रमुख नागेश गायकवाड, युवासेना शाखा अध्यक्ष जितेंद्र कदम, प्रसाद गायकवाड, विजय दुधभाते, श्रीपती बनसोडे, दिलीप सूर्यवंशी, जितेंद्र कदम, संजय पाटील, सुरेश घाटे, सुधाकर घाटे, चंद्रकांत गायकवाड, वैभव शिंदे, बालाजी गायकवाड, शुभम सूर्यवंशी, मनोज सूर्यवंशी, विनोद पाटील, मंथन गायकवाड, हुसेन मुजावर यांची उपस्थिती होती. यावेळी लसीकरण करून टॅगिंग करण्यात आले. 

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर व अतिवृष्टीच्या संकटाने शेतकरी व पशुपालक हैराण असताना सर्वत्र जनावरांत लंपीस्किन संसर्गाचा मोठ्याप्रमाणात फैलाव झाला असून अनेक जनावरे या आजाराला बळी पडत आहेत त्यामुळे जनावरांवर देखील होम क्वारंटाईन होण्याची  वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर गुंजोटी गणाच्या पंचायत समिती सदस्या सौ. क्रांतीताई व्हटकर यांनी पशुचिकित्सा विभागाला निवेदन देऊन लसीकरण करण्याची विनंती केली होती. याची दखल घेऊन मौजे औराद येथे लंपिस्किन व खरखुत आजाराबाबत लसीकरण करण्यात आले. या शिबिरात पशुपालक शेतकऱ्यांनी आपापल्या

४१३ जनावरांना लसीकरण करून घेतले. सर्वत्र जनावरांना मोठ्याप्रमाणात लंपीस्किन आजाराची लागण होत असून वेळीच प्रतिबंधात्मक औषधोपचार करणे गरजेचे आहे त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना लसीकरण व औषधोपचार करून घेण्याचे आवाहन पशुवैद्यकीय दवाखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top