तालुक्यातील मौजे जकेकूर येथे आम्रपाली बौध्द विहारात डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा “शाळा प्रवेश दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. साताऱ्यातील प्रतापसिहं शाळेत ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी बाळ भिवाने प्रतापसिंह हायस्कूल राजवाडा चौक,सातारा या शाळेत इयत्ता पहिली वर्गात प्रवेश घेतला होता. व येथूनच त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस सुरुवात केली होती. यावेळी यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली.तसेच सामुहिक त्रिसरण पंचशील घेवुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली शाळा प्रवेश दिनाच्या औचित्याने उपस्थित मुलं आणि मुलींनी बाबासाहेबांवर सुविचार सांगितले.शाळा प्रवेशाच्या पूर्वसंध्येला राज्य शिक्षण मंडळाचे सदस्य आयु. सुधीर कांबळे सर यांनी विद्यार्थी वउपस्थितांना मार्गदर्शन केलं. ते पुढे म्हणाले डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळा
प्रवेश दिन म्हणजे एका अर्थाने सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्रांतीची आणि युगांतराची सुरुवात होती. डॉ.बाबासाहेब स्वतः शिकले आणि प्रज्ञावंत झाले. कोट्यवधी वंचितांचे उद्धारकर्तेही झाले. आज जगात आदर्श संविधान म्हणून भारतीय संविधानाचा जगभर गौरव होत असतो. त्या भारतीय संविधानाचे ते शिल्पकारही ठरले. परिणामत: भारतीय समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मानवी मूल्ये रुजू शकली.म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा “ शाळा प्रवेश दिन” हा अत्यंत महत्वाचा आहे. यावेळी बुध्दवंदनेच्या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. यावेळी बालकांना उत्कर्ष देवणीकर सर यांच्या तर्फे खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवन कांबळे यांनी केले. तर आभार अनिल कोल्हे यांनी मानले. यावेळी रोहित गायकवाड, अमोल कांबळे, शक्ती कांबळे, व्यंकट सोनकांबळे, नवनाथ कांबळे, चंद्रकांत कांबळे आदी नागरिक उपस्थित होते.
