परंडा / प्रतिनिधी : -
तालुक्यातील इनगोंदयाचे सुपुत्र सुरेश जगताप यांची पुणे महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केल्याबद्दल तालुक्याच्या वतीने इनगोदा येेथे रविवार दि.८ रोजी त्यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा भाजपा नेते अॅड . संतोष सुर्यवंशी, काँग्रेसचे नेते अॅड . श्रीकांत भालेराव, राष्ट्रवादीचे ता.अध्यक्ष अॅड. संदीप पाटील, परंडा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश घाडगे व पत्रकार आनंद खर्डेकर उपस्थित होते .
