महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री श्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने तसेच प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्री. बसवराज पाटील, वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. अमित देशमुख, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. धिरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खालीलप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील भूमच्या तालुकाध्यक्षपदी (माजी न.प.सदस्य) श्री. रूपेश शेंडगे, तालुका वाशीच्या अध्यक्षपदी श्री राजेश शिंदे, तालुका परंड्यांच्या अध्यक्षपदी अॅड. हनुमंत वाघमोडे, परंडा तालुका कार्याध्यक्षपदी अॅड. अजय खरसडे, व परंडा शहर अध्यक्षपदी (माजी नगराध्यक्ष) श्री रमेशसिंह परदेशी यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत असे उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. धिरज (भैय्या) पाटील यांनी कळविले आहे.
तरी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नोंद घ्यावी व उस्मानाबाद जिल्ह्यातील कॉग्रेस पक्षाला बळकटी मिळण्यासाठी कार्य करावे असे आवाहन मुख्य संघटक जिल्हा कॉगे्रस कमिटीचे श्री. राजाभाऊ शेरखाने यांनी केले आहे.
