उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, के. टी. पाटील फार्मसी महाविद्यालयाच्या 04 विदयार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणा-या NIPER JEE 2020 या राष्ट्रीय परीक्षेत उत्तुंग यश मिळवले. National Institute of Pharmaceutical Education and Research ही परीक्षा देशातील सात केंद्र सरकार संचलित महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी होती. 28 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या सदर परीक्षेमध्ये कु. पाटील मयुरी प्रकाश या विद्यार्थीनीने ऑल इंडिया रँक 1075. कु. हिंगोले प्राजक्ता धाराजी या विद्यार्थीनीने ऑल इंडिया रँक 1328. कुमार. यादव गणेश शिवाजी या विद्यार्थ्याने ऑल इंडिया रँक 1533 व कु. काझी अबुसुफीयान इक्कबाल या विद्यार्थ्याने ऑल इंडिया रँक 1636 वा क्रमांक प्राप्त केला. सदरील विद्यार्थ्याचा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी श्री आदित्य पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल जोशी यांनी सत्कार केला. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असे कौतुकास्पद गौरवउद्गार काढले. 

सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे सरचिटणीस श्री के. टी. पाटील सर, संस्थेचे अध्यक्ष श्री सुधीर के पाटील, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल जोशी तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

 
Top