तुळजापूर /  प्रतिनिधी-  

देशातील इतर राज्यातील मंदीरे धार्मिक स्थळे उघडे असताना महाराष्ट्रातील बंद का ?असा सवाल करुन महाराष्ट्र शाषणाने लवकर मंदीरे भाविकांन साठी खुले न केल्यास राज्यपालांन कडे  मंदीरे धाव घेणार वेळ प्रसंगी मंदीरे खुले करण्यासाठी न्यायालयात ही दाद मागणार अशी माहीती माजीमंञी  तथा आमदार तथा श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानचे विश्वस्त राणाजगजितसिंहपाटील यांनी गुरुवार दि.1 रोजी पञकार परिषद घेवुन दिली.

महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे भक्तांन साठी खुले करावेत या बाबतीत आयोजित पञकार परिषदेत पुढे बोलताना राणाजगजितसिंहपाटील  म्हणाले कि महाराष्ट्र शाषाणाने दारु विक्री सुरु केली आता बार हाँटेल सुरु करतय मग मंदीर का उघडत नाही असा प्रश्न करुन या पुर्वी आम्ही धार्मिक स्थळे उघडण्यासाठी आंदोलन केले पण आता ते करणे योग्य वाटत नाही .त्यामुळे महाराष्ट्र शाषणाने या पुर्वी मंदीर दहा दिवसात खुले करण्या बाबतीत जे भाष्य केले होते ते बोलणे आततरी खरे करुन दाखवावे,असे आवाहन केले

देशातील वैष्णोवदेवी तिरुपती बालाजी  सह अनेक मंदीर खुले असुन भाविक दर्शन घेत आहेत माञ शिवरायांच्या महाराष्ट्रातील बंद आहेत.महाराष्ट्रात मंदीरे खुले नसल्यामुळे धार्मिक स्थळांन मधील मंदीरावर अवलंबून असणाऱ्या हजारो लोकांचा उदारनिर्वाहाचा प्रश्न आज गंभीर बनला आहे. महाराष्ट्र शासनाने नियम अटी शर्ती घालुन मंदीरे खुले करण्यासाठी परवानगी द्यावी आपण सांगाल ते नियम अटी शर्ती पाळण्यास विश्वस्त तयार आहेत शासनाने  मंदीरे खुले करण्याचे नियोजन पुर्वीच करायाला हवे होते आता नवराञोत्सवात तरी मंदीरे खुले करावेत असे शासनाला आवाहन केले अन्यथा राज्यपाल नंतर न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

मंदीर सुरु करताना प्रथमता थोड्या लोकांना प्रवेश द्या यात वडीलधारी मंडळी लहान मुले वगळा हळु हळु संखेत वाढ भाविकांची रँपिडअँन्टेजन टेस्ट करुनच मंदीरात प्रवेश द्या मंदीर समित्या ही आपण दिलेल्या अटी शर्ती नियम पालन करेल पण मंदीर उघड,  असे यावेळी आवाहन केले. लवकरच श्रीतुळजाभवानी मंदीराचे मुख्य गर्भगृहा चांदीचे करुन गर्भगृहात आकर्षक विद्युत यंत्रणा कार्यान्वित करण्याचा  मानस असुन हे कामे व तिर्थक्षेञ तुळजापूरातील विकास कामे कोरोना मुळे थांबल्याचे सांगितले. तिर्थक्षेञ तुळजापूर आंतरराष्ट्रीय दर्जाचे  पर्यटन स्थळ व शैक्षणिक हब करणार असून त्याचे कामही लवकरच सुरु होईल असे यावेळी स्पष्ट केले.

तिर्थक्षेञ तुळजापूरच्या विकासासाठी केंद्राकडून ही मोठा प्रमाणात निधी आणण्याचे नियोजन असल्याचे शेवटी म्हणाले ,यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, विनोद गंगणे, बापुसाहेब  नागेश नाईक,  राजेसिंह निंबाळकर, नारायण नन्नवरे, सुहास सांळुके आदी यावेळी उपस्थितीत होते 

 
Top