शै.वर्ष (२०१९—२०)मध्ये वैद्यकीय क्षेञात जाण्यासाठी देशपातळीवर वैद्यकीय प्रवेश पुर्व परीक्षा अर्थात NEETपरीक्षा संपन्न झाली होती. त्याचा निकाल नुकताच लागला असुन त्यामध्ये येथील रामकृष्ण परमहंस कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील रूषिकेश सुदाम मोहिते या विद्यार्थ्याने ७२० पैकी ६२७व श्री.अजिंक्य रामलींग चौरे याने ७२० पैकी५७२आणि कु.वर्षा करण वाघमारे हिने ७२०पैकी ४२८गुण प्राप्त करून उस्मानाबाद जिल्ह्यातून उच्चांकी गुण प्राप्त करून नवा इतिहास निर्माण केल्याबद्दल व घवघवित यश मिळविल्याबद्दल महाविद्यालयाकडून या तीनही यशस्वी विद्यार्थी,विद्यार्थिनीचा त्यांच्या आई,वडीलासमवेत सत्कार दि.१७आॅक्टोंबर रोजी, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की,वैद्यकीय क्षेञात जाण्यासाठी NEETपरीक्षेत, आपल्या महाविद्यालयातील या विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर मात करत मोठ्या कष्टाने अभ्यास करून गुण प्राप्त करून आपले डाॅक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले असून आपल्या आई,वडीलांचे व महाविद्यालयाचे नाव रोशन केले आहे व उस्मानाबाद परीसरातील व महाविद्यालयातील आजच्या विद्यार्थ्यांपुढे आदर्श ठेवला आहे. या विद्यार्थ्यांना घडवण्यात महाविद्यालयातील वर्ग शिक्षकांचे मोठे श्रेय आहे.
भविष्यात महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी या परीक्षेत चमकावेत यासाठी येथील शिक्षक मेहनत घेतील तसे नियोजन केले आहे.याप्रसंगी त्यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या व महाविद्यालयाचे वतीने अभिनंदन करून पुढील त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी उप प्राचार्य ब्रा.बबन सुर्यवंशी,प्रा.शेरखाने यांनी मनोगते व्यक्त केली.याप्रसंगी प्रा.प्रताप देशमुख,प्रा.कुटे, प्रा.शेख व महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक आणि सत्कारमुर्ती विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.आभार प्रा.मोहिते यांनी मानले.