तेर / प्रतिनिधी
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील १२ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकले असून या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत तेर ता. उस्मानाबाद येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील 12 विद्यार्थी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. यामध्ये इयत्ता पाचवी मधील श्रुती श्रीनिवास लाड 178 , अंजली ज्ञानेश्वर काळे 162 , तेजस्वीनी सुहास नाईकवाडी 142 , अक्षता शंभू कांबळे 136 , समर्थ कैलास लकापते 124 तर इयत्ता आठवी मधील देवकते वैष्णवी काका 162 , माने श्रावणी राजेंद्र 162 , भक्ते सागर बालाजी 158 कोकरे प्रणाली बबन 156 , आकांक्षा दिलीप भातभागे 146 , मगर मृदुला काकासाहेब 138 , टेळे श्रीमंत गुणवंत 138 गुण मिळवत शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत. यावेळी या यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक एस एस बळवंतराव यांच्यासह एस यु गोडगे , डी डी राऊत , एम एन भंडारे , एम एल कांबळे , जे बी बोराडे , आर एम देवकते , एम एन शितोळे , ए एन रणदिवे , हरी खोटे , एम एन नंरसिगे , ए बी वाघेरे , सुर्यकांत खटिंग , एम डी नंरसिगे , एस बी पाटील , ए बी नितळीकर , एस डी घाडगे , महंमद बागवान , आदिचे मार्गदर्शन लाभले.