उमरगा / प्रतिनिधी

अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.राज्य शासनाने जाहीर केलेली दहा हजारांची मदत अत्यल्प असून किमान २५ हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देण्यात यावी,राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेतुन बाहेर,काढावे, असे मत माजी मंत्री आमदार राना जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केले.

उमरगा तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त येणेंगुर, तुंगाव,गुंजोटी मुरूम परिसरात शेतकऱ्यांच्या शेतात पाहणी करून आले असता शनिवारी दि २४ रोजी पत्रकार परिषदेत ते बोलत होते

या वेळी जिल्हा अध्यक्ष नितीन काळे, तालुका अध्यक्ष कैलास शिंदे,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रा अस्मिता कांबळे, समाज कल्याण सभापती दिग्विजय शिंदे,माजी जीप अध्यक्ष नेताजी पाटील,अडँ अभयसिंह चालुक्य, माधव पवार, हर्षवर्धन चालुक्य राहुल पाटील आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना श्री पाटील म्हणाले की,शेतकऱ्यांचा ऊस पूर्णतः आडवा पडला असल्याने ऊस,व फळबागा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.नदी काठी असलेल्या शेतातील जमिनीची माती पूर्ण वाहून गेली आहे.अनेक गावातील घरात पुराचे पाणी गेल्याने घराची ओल कायम आहे.घरे खचली आहेत प्रशासकीय अधिकारी यांनी जे पंच नाम्याचे काम केलेले आहे ते कौतुकास्पद असून ज्याचे पंचनामे झाले नाहीत त्याचे तात्काळ पंचनामे पूर्ण करावेत पिकांची, जमिनीची फळबागा ची व खचलेल्या घराची आणि जमिनीतील माती वाहून गेल्याची वेगवेगळ्या प्रकारची मदत शासनाने करावी ज्याच्या जमिनीतील माती वाहून गेली आहे त्याना जमिनीत माती टाकण्यास मदत करावी शेतकऱ्यांचा एकही रुपया खर्च न करता सरकारने त्याचं बंधारे पूर्ण होण्यासाठी संघर्ष करू असे ते म्हणाले

केंद्र सरकारने मदत देण्याचे जाहीर केले आहे त्याला राज्य सरकार कडून रितसर मागणीचा प्रस्ताव सादर करावा लागतो नंतर केंद्रीय कमिटी त्याच्या पाहणी साठी येऊन मदत देत असते असे ते म्हणाले पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून संकट काळात सोबत असल्याचे सांगितले आहे.ती मदत निश्चित मिळेल अशी खात्री त्यानीं दिली.

या वेळी नगरसेवक अरुण इगवे,सुनील माने,विष्णू साळूखे,उमेश स्वामी,अनिल बिराजदार, गोविंद पवार,आकाश शिंदे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते


 
Top