उस्मानाबाद/ प्रतिनिधी

‘दक्षता दिनानिमित्त’ उस्मानाबाद येथील विवेकानंद युवा मंडळ व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये मास्क वाटप, ऑनलाइन निबंधस्पर्धा व इतरही सामाजिक उपक्रम घेत दक्षता दिन साजरा करण्यात आला. 

दक्षता दिन म्हणजे आपल्या दैनंदिन वावरण्यात आपण कोणकोणत्या नियमांचे पालन करतो व त्याची दक्षता घेतो याविषयी पाळावयाच्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचा हा दिन, यानिमित्त शहरातील वेगवेगळ्या चौकांमध्ये दक्षता दिनाची माहिती पत्रके तयार करून ते वाटण्यात आली. यावेळी नेहरू युवा केंद्राचे विजय कोळगे, विवेकानंद युवा मंडळाचे बाळकृष्ण साळुंके, शुभम मगर, सुयोग गांधले, स्वप्नील देशमुख, धीरज देशमुख, अक्षय शिंदे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top