कळंब /प्रतिनिधी-

 येथे स्वंयम शिक्षण प्रयोग संस्था व न्युनीसेफ व हिंदुस्थान युनी लिव्हर लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने कळंब तालुक्यातील सर्व कोविड 19 च्या संबंधित कार्यालयात हात धोन्याचे साबण व मास्क चे वाटप करण्यात आले

सध्या कळंब तालुक्यातील करोना रुग्णाची संख्या झपाटय़ाने वाढत आहे अशा परिस्थितीत प्रशासनाने कडुन ठिक ठिकाणी कोविड सेन्टर उघडण्यात आलेले आहेत. तसेच त्या ठिकाणी विविध कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता पाॅझिटिव्ह रुगाची सेवा करत असलेले दिसुन येत आहे. यात कळंब नगर परिषदचे स्वच्छता विभागातील कर्मचारी वर्गाचे काम अंत्यत जोखमीचे असले तरी ते त्या ठिकाणी जाऊन साफसफाई करतात हाच परस्पर हेतु डोळे समोर ठेवून स्वंयम शिक्षण प्रयोग संस्था आणि न्युनीसेफ व हिंदुस्थान युनी लिव्हर लिमिटेड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने गेल्या काही दिवसांपासून 15 हजार साबण आणि सात हजार मास्क चे वाटप करण्याचा उपक्रम सध्या सुरू असलेल्या कळंब तालुक्यात दिसुन येत आहे

दि 19 ता सदरील साहित्याचे वाटपाची सुरुवात कळंब नगर परिषदचे मुख्याधिकारी रमेश जाधव व संयम संस्थेच्या तालुका समन्वयक संगिता राऊत यांच्या हस्ते सफाई कामगारांना मास्क वाटप करुन करण्यात आली यावेळी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, नगरसेवक लक्ष्मण कापसे, नगरसेवक सुभाष पवार, सागर मुंडे, महेश पुरी उपस्थित होते

 सदरील साहित्य कळंब नगर परिषद, शासकीय रुग्णालय, कोविड सेन्टर व तालुक्यातील सर्व पीएससी मध्ये वाटप करण्यात आले


 
Top